पत्रकार जगदीश कदम स्मृती जिल्हास्तरीय लेख स्पर्धा

लांजा : येथील दिवंगत पत्रकार जगदीश कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुला गट जिल्हास्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

इन्फिगोचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी उलगडला स्वतःचा जीवनप्रवास

गोळप (ता. रत्नागिरी) येथील गोळप कट्टामध्ये सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अल्पावधीत रत्नागिरीत नावाजलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.

दृष्टीबरोबरच दृष्टिकोन देणारा डॉक्टर – डॉ. श्रीधर ठाकूर

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीतील पंधराव्या हॉस्पिटलचं उद्घाटन रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी झालं. मुंबईतल्या नेत्र रुग्णालयाच्या साखळीतलं एक हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू झालं असलं तरी ते मूळच्या कोकणवासीयाने सुरू केलं आहे, हे त्याचं विशेष. हे वैशिष्ट्य जपणाऱ्या, रुग्णांना दृष्टी देणाऱ्या आणि औपचारिक तसंच अनौपचारिक संवादाद्वारे समाजालाही दृष्टिकोन देणारे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचं अभीष्टचिंतन!