एक फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा पुन्हा सुरू; गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा २२ मार्च २०२०पासून बंद होती. त्यानंतर गेले काही महिने ही सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरू होती; मात्र येत्या एक फेब्रुवारी २०२१पासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल) सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मा. दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय होणार

मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे मत्स्यशेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध

मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे माशांच्या शेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध असून, येत्या आठ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या या निविदा संधीचा लाभ कोकणातील उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोकणभूमी प्रतिष्ठानच्या कोकण बिझनेस फोरमतर्फे करण्यात आले आहे.

मुक्त प्रवासाला अडसर ठरणारी महाराष्ट्रातील ई-पासची अट रद्द

राज्यात अनलॉक ४ ची नियमावली ३१ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत लॉकडाउनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे.

कांजूरमार्गच्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी ई-पाससह बससेवा

मुंबई : कांजूरमार्ग येथे सामाजिक कार्य करणाऱ्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी माफक दरात बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत पाच ऑगस्टपासून एसटीचे बुकिंग; प्रवासाचे नियम जाहीर

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत उद्यापासून (पाच ऑगस्टपासून) एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यातून येण्याचे, तसेच परतीच्या वाहतुकीचेसुद्धा आरक्षण उद्यापासून मिळणार आहे, असे रत्नागिरीच्या एसटी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.