मुंबईत १४ जुलै रोजी एका आजोबांना करोनावर मात केल्यावर घरी सोडण्यात आले. ते १५ जुलै २०२० रोजी आपल्या वयाची १०१ वर्षे पूर्ण करणार आहेत. अर्जुन गोविंद नारिंग्रेकर असे या आजोबांचे नाव आहे, असे आकाशवाणीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबईत १४ जुलै रोजी एका आजोबांना करोनावर मात केल्यावर घरी सोडण्यात आले. ते १५ जुलै २०२० रोजी आपल्या वयाची १०१ वर्षे पूर्ण करणार आहेत. अर्जुन गोविंद नारिंग्रेकर असे या आजोबांचे नाव आहे, असे आकाशवाणीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गृह विलगीकरण १४ दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे करावे, अशी मागणी करणारे निवेदन चाकरमान्यांतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (सात जुलै) राजभवन येथील प्राचीन देवी मंदिरात जाऊन देवीची आरती केली.
मुंबई : केंद्र सरकारने टिकटॉक या अॅपवर बंदी घातली असली, तरीही या ॲपचे अनेक चाहते आहेत. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक खोटी टिकटॉक प्रो लिंक बनवण्यात आली आहे. कोणीही अशा लिंकवर क्लिक करू नये, तसेच ती फॉरवर्डही करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहण लाइव्ह पाहा मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रातून… सोबत वैज्ञानिकांचे मार्गदर्शनही…
मुंबई : लॉकडाऊन काळात बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारी सवलतही (स्लॅब बेनिफिट) देण्यात आली असून, ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.