जिल्हाधिकाऱ्यांची मुले अंगणवाडीत

खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज सरकारी शिक्षकांनीच आपल्या कृतीतून तयार केला आहे. अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक उत्तम भौतिक सुविधा मिळतात. पण त्यांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षक अपुरे ठरतात. नंदुरबारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनीच आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातल्यामुळे त्यांचा आदर्श तेथील अधिकारी घेतील आणि त्यामुळे शाळांचा शैक्षणिक दर्जाही सुधारायला नक्कीच मदत होईल. तोच आदर्श सर्व ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा.

मचाणावरचे दळणवळण

निपुण भारत परीक्षा ऑनलाइन घ्यावी लागते. त्यासाठी आवश्यक असलेली इंटरनेट सुविधा गावात नसल्याने माखजन, धामापूर येथील केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी गावातील उंच ठिकाणी झाडावर बांधलेल्या मचाणावर चढाई केली आणि तेथे इंटरनेट उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. हे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत; पण या उपक्रमाचे कौतुक करताना इंटरनेटची अत्यावश्यक सुविधा आपण गावांपर्यंत पोहोचवू शकलो नाही. त्यात आपल्याला अपयश आले, याचे वैषम्य लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनालाही वाटणार नाही. देशाच्या प्रगतीमधील हाच खरा आणि मोठा अडथळा आहे. तो आहे, तोपर्यंत दळणवळणासाठी रानातली झाडावरची मचाणेच शोधावी लागणार आहेत.

रत्नागिरीतील नऊ गावे आदर्श म्हणून विकसित करणार : उदय सामंत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, महसूल सेवा पंधरवडा आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचं उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झालं.

गावचे मुख्यमंत्री काय करणार?

सरपंच हाच गावाचा मुख्यमंत्री असतो. त्यांनी त्यांची ताकद विधायक दृष्टीने वापरली तर गावाला अनेक बक्षिसे मिळू शकतात. त्या दृष्टीने सरपंचांनी काम करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यशाळेत व्यक्त केली. प्रत्यक्षात एखादा अपवाद वगळला तर गावाला दिशा देऊ शकेल अशा नेत्यांचीच अलीकडे वानवा आहे. मुळात त्यांना त्यांच्या कामाची जाणीवच नसते, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळेच मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अपेक्षा केलेली कामे त्यांच्याकडून होण्याची शक्यता धूसर बनते. राजकीय सोयी-गैरसोयी पाहून लोकप्रतिनिधी निवडले जातात. म्हणूनच आपल्याला निवडून आणून पदे बहाल करणाऱ्या मोठ्या नेत्यांची तळी उचलून धरण्यापलीकडे आपल्याला काही काम करायचे असते, याची त्यांना जाणीवच नसते. गावागावांमध्ये तसाच अनुभव येतो.

शेतीच्या सर्व समस्यांवर उपाय ठरेल अशा बांबूची लागवड कोकणात फायद्याची; लवकरच राज्याचे पहिले बांबू धोरण

‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

गावातल्या मुलांना रोजगार देणाऱ्या कंपनीविरोधात ग्रामसभा फक्त आपल्याकडेच होते : पालकमंत्री डॉ. सामंत

‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.