बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची गरज : कुमार केतकर

‘कोकणासह मुंबईही पूर्णपणे बदलली आहे. मूळच्या कोकणातील लेखकांनी निर्माण केलेले साहित्य कोकणाचे चित्रण करणारे होते. आजकाल वास्तवाशी संबंध असलेल्या साहित्याची निर्मिती होत नाही. बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची आज गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.

कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीपासून ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रिंगणे (ता. लांजा) येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक, माजी खासदार कुमार केतकर भूषवणार आहेत.

तीस जानेवारीपासून रिंगणे येथे अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आरगाव, झर्ये ग्रामस्थांनी आयोजित केलेले अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रिंगणे (ता. लांजा) येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या काळात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची आगळीवेगळी दिवाळी अंक स्पर्धा

रत्नागिरी : दिवाळी अंक ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी अंक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सातवाहनकालीन अणुस्कुरा घाट परिसरात वृक्षारोपण

राजापूर : सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या अणुस्कुरा घाटातील उगवाई मंदिर परिसरात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि जंगल ट्रेल उपक्रम पार पडला.

ग्रामीण साहित्य संमेलनाचा संस्मरणीय सोहळा

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेने दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या प्रारंभी वाटूळ (ता. राजापूर) येथे साजरे केले. त्याला दोन महिन्यांचा काळ लोटला असला, तरी त्याच्या स्मृती अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात जाग्या आहेत.