भक्तिरंगांत बहरली रत्नागिरीकरांची आषाढी एकादशीची संध्या…

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते.

आषाढी एकादशीनिमित्त ‘रंग पांडुरंग’ अभंग गायन

रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सप्तसूर म्युझिकल्स रत्नागिरी निर्मित ‘रंग पांडुरंग’ हा अभंगांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

सप्तसूर म्युझिकल्स अभंग स्पर्धा प्राथमिक फेरी – रत्नागिरीतून तन्वी मोरे, सिंधुदुर्गातून महेंद्र मराठे प्रथम

रत्नागिरी : पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमत संजीवनी गाथा’ राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला.