ग्रामीण भागातील निरपेक्ष रुग्णसेवेसाठी कोलगावच्या वैद्या सौ. उमा प्रभुदेसाई यांचा गौरव

कोलझर : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे कार्यरत असलेल्या वैद्या सौ. उमा मिहीर प्रभुदेसाई (पूर्वाश्रमीच्या सत्त्वश्री कोनकर) यांचा ग्रामीण भागातील निरपेक्ष रुग्णसेवेसाठी गौरव करण्यात आला. कोलझर (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथील साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ या संस्थेने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १० व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यात आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी वैद्या सौ. प्रभुदेसाई यांना गौरवण्यात आले.

वेंगुर्ल्यात समुद्रतळाशी युद्धनौकेमध्ये संग्रहालय; देशातील पहिल्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ

आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि त्याभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून, याची मुहुर्तमेढ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (१० जून) रोवण्यात आली.

कोकण स्वरप्रतिभा शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : पणजी (गोवा) येथील स्वस्तिक कल्चरल असोसिशनतर्फे लहान मुलांसाठी कोकण स्वर प्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बारावीच्या निकालात कोकण विभागीय मंडळाचे प्रथम स्थान कायम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने ९६.७४ टक्के निकालासह पहिले स्थान कायम राखले आहे. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा; राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय

मुंबई : राज्यात मत्स्यव्यवसायाला आजपासून (२२ एप्रिल २०२५) कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचा राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना फायदा होणार आहे.

साळिस्ते येथे , सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ढोल-ताशा वादन स्पर्धा

तळेरे (कणकवली) : साळिस्ते गुरववाडी (ता. कणकवली) ग्रामस्थ मंडळातर्फे वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ढोल-ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.