नागपूर-मडगाव रेल्वेगाडीला २९ डिसेंबरपर्यंत मुदवाढ

रत्नागिरी : नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतीक्षा द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला येत्या २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षारंभ कार्यक्रम १४ ऑगस्टला

आजगाव (ता. सावंतवाडी) : थोर साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षारंभाचा कार्यक्रम येत्या १४ ऑगस्ट रोजी आरवली (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आला आहे.

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे १२ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल पुरस्कारांच्या तपपूर्तीनिमित्ताने यावर्षी १२ विशेष तपस्वी गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

तळेरे (ता. कणकवली): अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने सलग चौथ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी २९ सप्टेंबरपर्यंत धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते खान्देश मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या नागपूर मडगाव प्रतीक्षा द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना त्यामुळे आणखी एक गाडी उपलब्ध झा्ली आहे.

रत्नागिरीत लोकसभेसाठी अखेरच्या दिवशी नारायण राणेंसह सात अर्ज

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नारायण राणे यांच्यासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.