रत्नागिरीत चक्रीवादळाने साडेतीन लाख ग्राहक अजूनही विजेविना; जिल्ह्यात किमान एक हजार घरांचे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रात रविवारी, १६ मे रोजी झालेल्या तौते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहेत.

तौते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रातून कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौते चक्रीवादळाने गती बदलल्याने त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्काळात पोलिसांनी रस्त्यावरची झाडे हटवून मोठे मदतकार्य केले.

तौते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागांना फटका

रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगड परिसरात दुपारी दाखल झाले. या वादळामुळे राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात जोरदार वादळी वारे वाहत आहेत.‌