सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.

रत्नागिरी जिल्ह्यात आता दर शनिवार-रविवारी लॉकडाउन

ना प्रतिबंधासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये १० जूनपासून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आता यापुढे दर शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाउन असेल, तर इतर दिवशी सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत पूर्ण संचारबंदी लागू राहील.

राज्यातील लॉकडाउन १५ मेपर्यंत

मुंबई : करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात सध्या सुरू असलेले लॉकडाउन येत्या १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश आज सायंकाळी जारी केले.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत २२ एप्रिलला रात्री आठपासून लागू होणारी सुधारित नियमावली

कोविड-१९च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे, असा विचार करून राज्य सरकारने साथरोग नियंत्रण कायदा १८९७मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर खालील उपाययोजना लागू करायचे ठरवले आहे. या उपाययोजना २२ एप्रिल २०२१च्या रात्री आठ वाजल्यापासून १ मे २०२१च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील, असे सरकारतर्फे कळवण्यात आले आहे.

करोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्यात आता ‘ब्रेक द चेन’; संपूर्ण नियमावली

मुंबई : करोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिपरिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता मिशन बिगिन अगेनच्या ऐवजी ब्रेक द चेन आदेश लागू राहणार आहेत. रात्रीची संचारबंदी आणि दिवसभर जमावबंदी असे या मोहिमेचे स्वरूप असेल. सोमवार ५ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाईल.