मुंबई : करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात सध्या सुरू असलेले लॉकडाउन येत्या १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश आज सायंकाळी जारी केले.
ऑपरेशन ब्रेक दे चेन मोहिमेनुसार गेल्या १३ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेले आदेश १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे या आदेशात म्हटले आहे. सर्वप्रथम १३ एप्रिल रोजी वीकेंड म्हणजे शनिवार-रविवारचे लॉकडाउन जारी करण्यात आले होते, तर २१ एप्रिल रोजी संपूर्ण लॉकडाउन आदेश जारी करण्यात आले होते. ते ३० एप्रिलपर्यंत अमलात राहणार होते. पण आता त्यामध्ये १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Mediaशेअर करा...
Related
शेअर करा...
Related

