सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांच्या संख्या अधिक आहे. आज (२९ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार २५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर नवे १५७ रुग्ण आढळले. आज १२ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

आज एकाच दिवशी २५८ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ९ हजार ५९० झाली आहे.

आजच्या १५७ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १२ हजार १७२ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६, दोडामार्ग – ७, कणकवली – १८, कुडाळ – ६२, मालवण – १७, सावंतवाडी – १०, वैभववाडी – ९, वेंगुर्ले १२, जिल्ह्याबाहेरील ४.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार २५७ आहे. सर्वाधिक ४३४ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड २८०, दोडामार्ग ८८, कुडाळ ३६३, मालवण ३६८, सावंतवाडी २३३, वैभववाडी २६२, वेंगुर्ले १७७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५२. सक्रिय रुग्णांपैकी २०८ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १८३ रुग्ण ऑक्सिजनवर तर २५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३१९ झाली आहे. आज सर्वाधिक ६ जणांचा मृत्यू कणकवली तालुक्यातील रुग्णांचा झाला. जिल्ह्यातही आतापर्यंत सर्वाधिक ७८ मृत्यू कणकवली तालुक्यातच झाले आहेत. इतर तालुक्यांमधील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ३२, दोडामार्ग – ९, कुडाळ – ४७, मालवण – ४०, सावंतवाडी – ५९, वैभववाडी – ३२, वेंगुर्ले – २२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – १.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply