करोनाप्रतिबंधासाठी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा, तर दुसरा कोव्हीशिल्डचा घेऊ शकतो का?

प्रश्न : करोनावर कोणती लस चांगली… कोव्हॅक्सिन की, कोव्हिशिल्ड?

उत्तर : संशोधनांती असं लक्षात आलं आहे की, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्हीही लसी परिणामकारक आहेत. नागरिकांना दोन्ही लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत. कारण, करोनासारख्या गंभीर आजारात मृत्यू होण्यापासून बचाव करतात.

प्रश्न : पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेऊ शकतो का?

उत्तर : नाही. करोनाच्या लसीकरणात दोन्ही वेळचे डोस एकच असावेत.

प्रश्न : हार्ट बायपास झालेल्या रुग्णांना करोनाची लस देऊ शकतो का?

उत्तर : हो. हार्ट बायपास झालेल्या रुग्णांना करोनाची लस टोचली तरी चालते.

प्रश्न : करोनाची लस घेतल्यानंतर पुन्हा करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे का?

उत्तर : याविषयी आपल्या देशात मर्यादित डेटा आहे. परंतु, अमेरिकेच्या सेंट्रल फाॅर डिसीज कंट्रोल या एजन्सीनुसार ९९.९९ टक्के लोकांना करोनाची लस घेतल्यानंतर बाधा झालेली नाही.

प्रश्न : संबंधित रुग्णाला अॅतलर्जी असेल तर, करोनाची लस घ्यावी का?

उत्तर : अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण, अॅ लर्जीमध्ये विविध प्रकार असतात. संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे जावे. तुमच्यावर लसीनंतर अॅ.लर्जी झाली असेल तर विविध उपाय आणि उपचार करू शकतील.

प्रश्न : करोनाच्या लसीकरणानंतर कोणती लक्षणं दिसतात?

उत्तर : करोनाची लस घेतल्यानंतर ताप येणे, थंडी वाजणे, कणकण येणे, अशक्तपणा जाणवणे, अशी लक्षणं दिसू शकतात. अशावेळी ‘पॅरासिटामाॅल’ घ्या. दोन-तीन दिवसांत तुम्ही ठीक होऊन जाल. लसींमुळे कोणताही मोठा परिणाम होणार नाही. ज्या ठिकाणी इन्जेक्शन घेतलं आहे तिथली जागा लाल होईल आणि थोड्याशा वेदना होतील.

प्रश्न : समजा, मी करोनाचा पहिला डोस घेतला आहे आणि नंतर माझ्या कुटुंबात एखादा सदस्य करोनाबाधीत झाला. तर, दुसरा डोस घेताना कोणती खबरदारी घ्यावी?

उत्तर : पहिल्या डोसनंतर जी कोणती तारीख ठरलेली आहे, त्या तारखेला दुसरा डोस घ्या.

प्रश्न : ज्यांना पूर्वी विविध आजार झाल्यांची किंवा होऊन गेल्याची नोंद आहे, अशा रुग्णांनी करोनाची लस घेतली तर चालते का?

उत्तर : जेव्हा तुम्ही करोनाची लस घेण्यासाठी जाल, तेव्हा डाॅक्टरांचा सल्ला घ्या किंवा त्यांना कल्पना देऊ जा.

प्रश्न : एखाद्याला थायरॉईडचा त्रास असेल तर करोनाची लस घेऊ शकतो का?

उत्तर : हो. त्यांना लस घेण्यात कोणतीही अडचण नाही.

प्रश्न : करोनाची लस घेतल्यानंतर इतर कोणत्या चाचण्या करणं गरजेचं आहे?

उत्तर : कोणत्याही चाचणची गरज नाही. फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात कुठेही त्याची गरज नाही. जर तुम्हाला करोनाची लक्षणं जाणवत असतील, असं वाटत असेल तर करोनाची लस घेण्यापूर्वी एका करोनाची चाचणी करून घ्या.

प्रश्न : ज्या ठिकाणी पहिला डोस घेतला त्याच ठिकाणी दुसरा डोस घ्यायचा का?

उत्तर : असं काहीही नाही. तुम्ही तुमचा दुसरा डोस कोणत्याही लसीकरण केंद्रात घेऊ शकता.

प्रश्न : करोना लस घेतल्यानंतर पुन्हा करोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

उत्तर : नाही. भारतात निर्माण झालेल्या लसींमध्ये थेट करोनाचे विषाणू नसतात, त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. लस घेतल्यानंतर निष्काळजीपणाने वागू नका. मास्क वापरणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. करोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रुग्णांच्या शरीरात पूर्ण क्षमतेने प्रतिकारशक्ती कार्यरत होते.

प्रश्न : पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये फरक आहे का?

उत्तर : अजिबात नाही.

प्रश्न : रक्त पातळ होण्याची औषधे सुरू असतील तर, लसीकरणापूर्वी ती औषधं घेणं थांबवावं का?

उत्तर : नाही. तुमची सुरू असलेली औषधं नियमित घ्या.

प्रश्न : पहिला डोस घेतल्यानंतरही करोनाची लागण झाली, तर काय करावं?

उत्तर : दुसरा डोस घ्या. १-२ आठवड्यानंतर रिकव्हर होऊ शकता. जर पहिल्या डोसनंतर करोना झाला तर २८ दिवसांनी करोनातून संपूर्ण रिकव्हर होऊ शकता.

प्रश्न : स्तनपान करणाऱ्या महिलांना आणि गरोदर मातांना करोनाची लस देऊ शकतो का?

उत्तर : नव्या नियमांनुसार अजूनतरी यासंबंधी सल्ला देण्यात आलेला नाही.

प्रश्न : हृदयविकाराचे आजार असणारा रुग्ण लस घेऊ शकतो का?

उत्तर : हो.

प्रश्न : कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णाला लस घेता येते का?

उत्तर : हो. रुग्णाला मागे काही आजार होऊन गेले असतील, तर ते रुग्ण लस घेऊ शकतात.

प्रश्न : दुसऱ्या डोसनंतर पाय दुखू लागले तर… ही गोष्ट सामान्य आहे का?

उत्तर : पाय दुखण्याची विविध कारणं असू शकतात, त्यामुळे अशावेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

प्रश्न : करोनाची लस ही इतर विषाणुंच्या संसर्गासाठी उपयुक्त ठरते का?

उत्तर : करोनाची लस ही केवळ करोना रुग्णांसाठी दिली जात आहे. इतर विषाणुंच्या संसर्गासाठी ती दिली जाणार नाही. कारण, इतर संसर्गासाठी विविध लसी उपलब्ध आहेत.

प्रश्न : ज्येष्ठांना दुसरा डोस घेण्याची भीती वाटल्यास, दुसरा डोस घेतला नाही, तर चालेल का?

उत्तर : नाही. कारण, दोन्ही डोस घेतल्याशिवाय संपूर्ण परिणाम जाणवणार नाही. एक डोस पुरेसा नाही.

प्रश्न : लसीकरणानंतर नैसर्गिक प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) नष्ट होतील काय?

उत्तर : नाही. करोनाची लस ही अधिक प्रतिपिंडे तयार करते. शरीरातील नैसर्गित प्रतिपिंडांवर कोणताही परिणाम करत नाही. उलट शरीरात अधिक प्रतिपिंड निर्माण होतात.

प्रश्न : करोनामुक्त होऊन प्रतिपिंड तयार झाली आहे, तर करोनाची लस घेणं आवश्यक आहे का?

उत्तर : हो. करोनामुक्त झाल्यानंतरही लस घेणे आवश्यक आहे. कारण, प्रतिपिंडे जास्त काळ टिकू शकत नाहीत.

प्रश्न : काही कारणास्तव दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर चालते का?

उत्तर : हो. काही हरकत नाही. परंतु, दुसरा डोस घेणे महत्वाचे आहे. ४, ६ किंवा ८ आठवड्यानंतर दुसरा डोस घेणे जास्त चांगले असते.

प्रश्न : मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर विकार असणाऱ्यांना लस घेणं गरजेचं आहे का?

उत्तर : हो. अशा लोकांनाच करोनाचा जास्त धोका आहे. त्यांनी तर अग्रक्रमाने लस घ्यावी.

प्रश्न : पहिला डोस परदेशात आणि दुसरा डोस स्वदेशात घेतला तर चालतो का?

उत्तर : हो. ते शक्य आहे. पण, तोच एक पर्याय शिल्लक असेल तर…

प्रश्न : करोनाची लस घेतल्यानंतर कोणतेच साईड इफेक्ट दिसले नाही तर, ती लस प्रभावी असते का?

उत्तर : हो. नक्कीच.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply