रत्नागिरीत नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ एप्रिल) ६२६ नवे करोनाबाधित आढळले, तर ७२७ जण करोनामुक्त झाले. आज २१ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज मंडणगड वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये करोनाबाधित आढळले. सर्वाधिक १५१ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १३६, दापोली ४५, खेड १३, गुहागर ६५, चिपळूण ४७, संगमेश्वर ५६, लांजा ११, राजापूर ६३. (एकूण ४३६). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १५, दापोली ११, खेड १५, गुहागर २०, चिपळूण ७, संगमेश्वर ११२, लांजा ८ आणि राजापूर २. (एकूण १९०). (दोन्ही मिळून ६२६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २१ हजार ६९५ झाली आहे.

जिल्ह्यात आज ७७२ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १४ हजार ६३५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज ६७.४५ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ६७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख २६ हजार ७६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचा १ आणि आजचे २० अशा एकूण २१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६४० झाली असून मृत्युदर २.९४ टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १६३, खेड ८१, गुहागर २७, दापोली ६३, चिपळूण १२८, संगमेश्वर ९५, लांजा ३१, राजापूर ४६, मंडणगड ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply