झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय अठरावा – भाग १

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय अठरावा : मोक्षसंन्यासयोग

संन्यासाचा हेतू । त्यागाचेंहि वर्म ।
सांग, जेणें शर्म । पावेन मी ।।१।।

विशद करोनी । सांग हें सकळ ।
पुरवी ही आळ । पार्थ म्हणे ।।२।।

सकाम कर्माचा । त्याग घडे जो कीं ।
म्हणती विवेकी । संन्यास त्या ।।३।।

कर्में करोनीहि । फलाशा सांडिती ।
त्याग तो निश्चितीं । जाण बापा! ।।४।।

Chapter 18 – Accomplishment Of Sacrifice

Reason of relinquishment । Essence of abandonment।

What drives to merriment । Tell me please ।।1।।

Explain all this । Specify the details।

Satisfy my zeal । Parth requests ।।2।।

Abandoning functions । Full of desires ।

What men judicious । Call renunciation ।।3।।

Carrying on functions । Desisting from returns ।

Assume with confidence । That it is sacrifice ।।4।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)

अथाष्टादशोऽध्यायः । मोक्षसंन्यासयोगः

अर्जुन उवाच ।

संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १८-१॥

श्रीभगवानुवाच ।

काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ १८-२॥

त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ १८-३॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply