सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ९.०६ टक्के झाला असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी ५५.२० टक्के आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सद्यःस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता येत्या २१ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २८ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुधारित आदेशांनुसार निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.

या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रीनसह), नाट्यगृह बंद राहतील. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत ५० टक्के आसनक्षमतेुनसार डायनिंग सुरू राहील. सायंकाळी ४.०० नंतर पार्सल सेवा चालू राहील. शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा चालू राहील. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलिंग – दररोज सकाळी ५.०० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत. खासगी आस्थापना / कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत. खासगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सूक्ष्म वित्तसंस्था व गैरबॅंकिंग वित्त संस्था नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरू राहतील. शासकीय कार्यालयांसहित (सूट असलेली खासगी कार्यालये) ५० टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. करोनाविषयक कामे करणाऱ्या आस्थापना, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा / कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी ५.०० ते सकाळी ९.०० व सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० या वेळेत खेळ सुरू राहतील. सुरक्षित आवरणामध्ये सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत चित्रीकरणाला मुभा. सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर कुठेही वावरण्यास मनाई. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम / मेळावे – सोमवार ते शुक्रवार सभागृह / हॉल आसनक्षमतेच्या् ५० टक्के उपस्थितीत सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत. लग्नसमारंभ – जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत. अंत्ययात्रा / अंत्यविधी – जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत. बैठका / निवडणूक -स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा – सभागृह / हॉल आसन क्षमतेच्या ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत. बांधकाम – फक्त बांधकाम साइटवर निवासी / वास्तव्यास मुभा. बाहेरून मजूर आणण्या बाबतीत सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत. कृषि व कृषिपूरक सेवा – संपूर्ण आठवडाभर सायंकाळी ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. ई कॉमर्स वस्तू व सेवा- नियमित पूर्ण वेळ – दररोज. जमावबंदी / संचारबंदी – जमावबंदी (५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव) सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत संचारबंदी सायंकाळी ५.०० नंतर (फक्त अत्यावश्यक कामांसाठी मुभा). व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स – दररोज सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत क्षमतेच्या ५० टक्के पूर्वपरवानगीसह ए.सी.च्या वापरास मनाई. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) – पूर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे. माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह – नियमित सुरू राहतील. खासगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास – नियमित सुरू राहतील. प्रवासी लेवल ५ मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहील. उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधित घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमईसह – नियमित पूर्ण वेळ – दररोज. उत्पादक घटक १. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरावीक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवासुविधांना आवश्यक असणारे घटक -नियमित पूर्ण वेळ – दररोज. उत्पादन घटक – इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक यामध्ये अंतर्भूत नसणारे सर्व उत्पादन घटक – ५० टक्के स्टाफच्या हालचालीच्या परवानगीसह.

अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल – रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा आनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचादेखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चा माल उद्योग आणि आनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल. शासकीय व खासगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणासंबंधी सर्व कामकाज. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटण, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सूनपूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लास्टिक शीट, ताडपत्री, रेनकोट इत्यादी वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने. बांधकामांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने. शीतगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस. दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी. मालाची / वस्तुंची वाहतुक. पाणीपुरवठा विषयक सेवा. शेती संबंधीत सर्व कामकाज आणि शेतीविषयक कामकाज अखंडित सुरू राहण्यासाठी आवश्यक असणारी शेती पूरक सेवा (बी-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्तीविषयक कामकाज). मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे. पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादनेविषयक सेवा. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित. शासकीय आणि खासगी सुरक्षाविषयक सेवा. विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा. एटीएम, पोस्टल सेवा. बंदरे आणि त्या आनुषंगिक सेवा. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक). अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पॅकेजिंग मटेरियल यांचे उत्पादन करणारे उद्योग. पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तिक व संस्थांसाठी वस्तूचे उत्पादन करणारे घटक सुरू राहतील. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply