साप्ताहिक कोकण मीडियाच्या २० ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २० ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय
सर्वच राजकारण्यांना आपापल्या मतदारांना गणपतीला गावी आणायची घाई झाली आहे. पण त्यासाठी गावी राहणाऱ्या लोकांना वेठीस धरू नये, अशी अपेक्षा आहे.
ची दुसरी लाट जरा कमी होताना दिसत आहे. तरीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत त्यामध्ये विशेष फरक पडलाय, असं मानण्यासारखी परिस्थिती अजूनही नाही. तरीही गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे ७२ विशेष गाड्या सोडणार आणि एसटी महामंडळ गणपतीसाठी २२०० जादा बसेस सोडणार या दोन बातम्या अस्वस्थ करून गेल्या. गणपतीच्यावेळी उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती ही लसीकरण झालेलीच असावी, यासाठी प्रयत्नपूर्वक अभियान राबविणं गरजेचं आहे.
मुंबई : भारतात येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या करोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी व्यक्त केला आहे.
करोनाप्रतिबंधक लसीकरणाछ्या पार्श्वभूमीवर अनेक शंका आहेत. करोनाप्रतिबंधासाठी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा, तर दुसरा कोव्हीशिल्डचा घेऊ शकतो का, अशा अनेक शंकांचा त्यात समावेश आहे. त्या संभाव्य शंका आणि त्याची उत्तरे लस टोचून घेण्यापूर्वी वाचा.