रत्नागिरी, सिंधुदुर्गात होणार नीट परीक्षेची केंद्रे

रत्नागिरी : नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश करता यावा किंवा सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे केली होती. त्याला यश आले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची अडचण सुटणार आहे.

Continue reading

श्री महालसा स्तोत्र (संपूर्ण मराठी)

श्री महालसा म्हणजे श्री विष्णूचा मोहिनी अवतार. कुंकळ्ळी (गोमंतक) येथील कवी व्यंकटेश विष्णु वैद्य यांनी श्री महालसेचे मराठी स्तोत्र अनेक वर्षांपूर्वी रचले आहे. ते पुस्तक दुर्मीळ असल्याने येथे ते स्तोत्र उपलब्ध करत आहोत.

Continue reading

मुंबई, कोकणावर आता चक्रीवादळाचे संकट; चार जूनपर्यंत दक्षतेचा इशारा

रत्नागिरी : करोनाच्या संकटाने महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केलेले असतानाच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या भागांत अति वेगाने वारे वाहतील, तसेच, काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, ‘एनडीआरएफ’चे जवानही तैनात केले जात आहेत.

Continue reading