कोकण रेल्वेच्या पाच गाड्या सोमवारपासून नियमित गाड्या म्हणून धावणार

नवी मुंबई : कोकण रेल्वेवरील पाच गाड्या सोमवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत. करोनाच्या कालखंडात विशेष गाड्या म्हणून या गाड्या चालविल्या जात होत्या. आता त्या करोनपूर्व काळातील गाड्यांप्रमाणेच पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहेत. तसेच त्यांचे तिकीटदरही करोनापूर्व काळानुसारच असतील, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.

पश्चिम रेल्वेवरील चाकरमान्यांसाठी आणखी दोन गणेशोत्सव स्पेशल

नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६३ जादा गाड्या

नवी मुंबई : गणेशोत्सवाला कोकणात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर उत्सवाच्या काळात आणखी जादा ६३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये एलटीटी-रत्नागिरी, नागपूर-करमळी, एलटीटी-सावंतवाडी, पनवेल-सावंतवाडी, पनवेल-चिपळूण, दादर-रत्नागिरी आणि दादरमंगलुरू या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या ४ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत धावणार आहेत.

गणेशोत्सवाकरिता कोकण रेल्वेवरून आणखी ३८ गाड्या

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावरून आणखी ३८ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या पश्चिम रेल्वेवरून सुटणार असून वसई स्थानकात थांबून पुढे येणार असल्याने पश्चिम रेल्वेमार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांना त्या सोयीच्या ठरणार आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष ७२ गाड्या

मुंबई : गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विशेष ७२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. येत्या ८ जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात ८२ अप, तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.