कोकण रेल्वेच्या पाच गाड्या सोमवारपासून नियमित गाड्या म्हणून धावणार

नवी मुंबई : कोकण रेल्वेवरील पाच गाड्या सोमवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत. करोनाच्या कालखंडात विशेष गाड्या म्हणून या गाड्या चालविल्या जात होत्या. आता त्या करोनपूर्व काळातील गाड्यांप्रमाणेच पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहेत. तसेच त्यांचे तिकीटदरही करोनापूर्व काळानुसारच असतील, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेस ही गाडी करोनाच्या काळात विशेष गाडी म्हणून ०११११-०१११२ या क्रमांकाने धावत होती. आता ती १०१११-१०११२ या पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहे. त्याचप्रमाणे मांडवी एक्स्प्रेस (१०१०३-१०१०४), रत्नागिरी-मडगाव (१०१०१-१०१०२), दिवा-सावंतवाडी (१०१०५-१०१०६) या दररोज, तर मडगाव-मंगळूर (१०१०७-१०१०८) या रविवारशिवाय इतर ६ दिवशी धावणाऱ्या गाडीचा त्यामध्ये समावेश आहे. या गाड्या नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. त्यापैकी दिवा-सावंतवाडी आणि सावंतवाडी-दिवा, रत्नागिरी-मडगाव आणि मडगाव-रत्नागिरी तसेच मडगाव-मंगळूर आणि मंगळूर-मडगाव या गाड्या पॅसेंजर गाड्या असल्या तरी त्यांना तूर्त तरी एक्स्प्रेस गाड्या असेच संबोधण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक सवलत सुरू
दरम्यान, भारतीय रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार या सर्व गाड्यांमधून आरक्षित प्रवासी तसेच प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या गाड्यांना अनारक्षित म्हणजेच सर्वसाधारण डबे असणार नाहीत. सर्वसाधारण तिकीटही दिले जाणार नाही. पॅसेंजरसह सर्व गाड्यांचेही आरक्षण करावे लागणार आहे. पण त्यांना विशेष गाड्यांचा दर्जा नसल्यामुळे नियमित दर आणि आरक्षणाचा शुल्क एवढे तिकीट द्यावे लागेल. पॅसेंजर वगळता इतर गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणेच निम्मे दरात प्रवास करता येणार आहे. करोनाच्या काळात कमी प्रवाशांनी प्रवास करावा, यासाठी ही सवलत रद्द करण्यात आली होती.

……………………..

कोकण रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला तपशील पुढीलप्रमाणे :

Please find following Press Release regarding ” Operation of Regular Train Services “.

Railway Board has decided to operate train services with regular numbers and with fares as applicable for the concerned classes of travel and type of train, as per the extant guidelines.The details are as under:

Sr. NoSpecial Train No.Regular Train No.Train NameFromToFrequency
10111110111Konkan Kanya ExpressMumbai CSMTMadgaonDaily
20111210112MadgaonMumbai CSMTDaily
30111310103Mandovi ExpressMumbai CSMTMadgaonDaily
40111410104MadgaonMumbai CSMTDaily
50150110101Ratnagiri Madgaon – ExpressRatnagiri MadgaonDaily
60150210102Madgaon – Ratnagiri  ExpressMadgaonRatnagiri Daily
70150510105Diva – Sawantwadi Road ExpressDivaSawantwadi Road Daily
80150610106Sawantwadi Road – Diva ExpressSawantwadi Road DivaDaily
90149710107Madgaon  – Mangaluru Central  ExpressMadgaonMangaluru Central06 Days a Week (Except Sunday)           
100149810108   Mangaluru Central – Madgaon ExpressMangaluru CentralMadgaon       
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. तुतारी एक्स्प्रेस का सुरू केली नाहीत? ती सगळ्यात चांगली गाडी होती जिच्यामुळे आमच्यासारखे जेष्ठ नागरिक आरामात जाऊ शकतात

Leave a Reply