photo of person wearing protective wear while holding globe

रत्नागिरी जिल्ह्यात नऊ नवे करोनाबाधित, चार करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ नोव्हेंबर) करोनाचे नऊ नवे रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. कालच्यापेक्षा अधिक रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून ती ४७ झाली आहे.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत ९ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७८ हजार ९०६ झाली आहे. आज ४ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ४७१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.७९ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २५० पैकी २४३ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह, तर ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ५८२ नमुन्यांपैकी ५८० अहवाल निगेटिव्ह, तर २ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख २० हजार १०० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात ४७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले २६, तर लक्षणे असलेले २१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २६ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २१ जण आहेत. ५ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११, तर डीसीएचमध्ये १० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी २८ जण ऑक्सिजनवर, ३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १७.२४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४८३ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२१, खेड २२८, गुहागर १७३, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२२, रत्नागिरी ८२७, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४८३).

१२ नोव्हेंबरपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ लाख २८ हजार ३५२ जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. ४ लाख २१३ जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण १३ लाख २८ हजार ५६५ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply