रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात ८२ अप, तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून अधिकृत वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. सध्या करोनाचं विघ्न आल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक चाकरमान्यांची निराशा झाली होती; मात्र कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी या विशेष गाड्या धावणार आहेत. सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन धावतील. गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी या विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑगस्टपासून या ट्रेनसाठीचे बुकिंग सुरू होणार आहे. कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
सर्व गाड्या २४ डब्यांच्या असतील. त्यामधील १३ डबे स्लीपर, टू टायर एसी १, थ्री टायर एसीचे ४ आणि सर्वसाधारण ४ डबे असतील. शिवाय प्रत्येक गाडीला एसएलआरचे २ डबेही असतील.
गाड्यांचे वेळापत्रक
ट्रेन नं. ०११०७/०११०८ – लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी – डेली स्पेशल
१५ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रोज रात्री ८.३० वाजता ही गाडी एलटीटीवरून सुटेल आणि पहाटे ४ वाजता रत्नागिरीत पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ६.३० वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि दुपारी २.२० वाजता एलटीटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०११०५/०११०६ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड – डेली स्पेशल
१५ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रोज रात्री १० वाजता ही गाडी सीएसटीवरून सुटेल आणि सकाळी ८.१० वाजता सावंतवाडीत पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ८.५० वाजता सावंतवाडीतून सुटेल आणि रात्री ८.०५ वाजता सीएसटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०११०१/०११०२ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड – डेली स्पेशल
१५ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रोज रात्री ११.०५ वाजता ही गाडी सीएसटीवरून सुटेल आणि सकाळी ९.३० वाजता सावंतवाडीत पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १०.१० वाजता सावंतवाडीतून सुटेल आणि रात्री ९.४० वाजता सीएसटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०११०३/०११०४ – लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ – डेली स्पेशल
१५ ते २२ ऑगस्ट या कालावधीत रोज रात्री ११.५० वाजता ही गाडी एलटीटीवरून सुटेल आणि सकाळी १०.३० वाजता कुडाळला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत दुपारी १२ वाजता कुडाळातून सुटेल आणि रात्री ११ वाजता एलटीटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०१११३/०१११४ – लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड – डेली स्पेशल
२४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी ५.३० वाजता ही गाडी एलटीटीवरून सुटेल आणि दुपारी ३.५० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडीतून सुटेल आणि सकाळी ६.१५ वाजता एलटीटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०११११/०१११२ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड – डेली स्पेशल
२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी ५.५० वाजता ही गाडी सीएसटीवरून सुटेल आणि सायंकाळी ४.१५ वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ६.१५ वाजता सावंतवाडीतून सुटेल आणि सकाळी ५.५० वाजता सीएसटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०११०९/०१११० – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड – डेली स्पेशल
२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी ७.१० वाजता ही गाडी सीएसटीवरून सुटेल आणि सायंकाळी ७.१५ वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रात्री ८.३५ वाजता सावंतवाडीतून सुटेल आणि सकाळी ६.४५ वाजता सीएसटीला पोहोचेल.
ट्रेन नं. ०१११५/०१११६ – लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी – डेली स्पेशल
२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी ११.५५ वाजता ही गाडी एलटीटीवरून सुटेल आणि सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती गाडी २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत रात्री ८.३० वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि पहाटे ४.१५ वाजता सीएसटीला पोहोचेल.
करोना प्रतिबंधासाठी प्रवाशांसाठी सूचना
प्रवाशांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे करोना प्रतिबंधाचे नियम पाळून प्रवास करावा, अशी सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे.
(पश्चिम रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कोरोना साठी काय सूचना, अटी आहेत? कोरंटाईन कालावधी काय?
वेगळ्या सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. राज्य सरकारने दिलेल्या सूचना पाळाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.