रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केल्यानंतर थोड्याच वेळेत पश्चिम रेल्वेने २० जादा गाड्या सोडण्याची निश्चित केले असून, त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे येथून सावंतवाडी आणि कुडाळसाठी सुटणार आहेत
या सर्व गाड्या साप्ताहिक असून सर्व गाड्यांचे आरक्षण १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या गाड्यांचे तिकीट विशेष श्रेणीचे असेल. गाड्या वांद्रे, बोरिवली आणि वसई रोड येथे थांबणार असल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्यांना त्या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. या सर्व गाड्यांना टू टायर एसी, थ्री टायर एसी, सेकंड क्लास स्लीपर, सेकंड क्लास बैठकीचे आणि दोन एसएलआर डबे असतील.
या गाड्यांचा तपशील असा –
गाडी क्र. ०९००७ / ०९००८ – मुंबई सेंट्रल – सावंतवाडी – १७ आणि २४ ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (१८ आणि २५ ऑगस्ट) दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल परतीसाठी ही गाडी त्याच दिवशी दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. गाडीला २४ डबे असतील.
गाडी क्र. ०९००९ / ०९०१० – वांद्रे – सावंतवाडी – १८ आणि २५ ऑगस्ट रोजी रात्री पावणेअकरा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून ४० सावंतवाडीला पोहोचेल. दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी ती परतीच्या प्रवासाला निघेल. गाडीला १८ डबे असतील.
गाडी क्र. ०९०६१ / ०९०६२ – वांद्रे – कुडाळ – ही साप्ताहिक गाडी २० आणि २७ ऑगस्टला दुपारी तीन वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता कुडाळला पोहोचेल. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता ती वांद्र्याकडे पुन्हा रवाना होईल. गाडीला १८ डबे असतील.
गाडी क्र. ०९००१ / ०९००२ – मुंबई सेंट्रल – सावंतवाडी – ही गाडी १९ आणि २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी ती परतीच्या प्रवासाला निघेल. या गाडीला १८ डबे असतील.
गाडी क्र. ०९०११ / ०९०१२ – वांद्रे – सावंतवाडी – ही गाडी २३ आणि ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी ती परतीच्या प्रवासाला निघेल या गाडीलाही अठरा डबे असतील.
करोना प्रतिबंधासाठी प्रवाशांसाठी सूचना
प्रवाशांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे करोना प्रतिबंधाचे नियम पाळून प्रवास करावा, अशी सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे.
(मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
One comment