लोकमान्य टिळक अनुवादित चरित्राचे रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान लिखित साधना प्रकाशनाच्या लोकमान्य टिळक चरित्र या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज (स्मृतिशताब्दी विशेष ग्रंथ)

लोकमान्य टिळक यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज या ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे. टिळकांनी पाहिलेली भव्य स्वप्ने आणि आजचा भारत हा विषय केंद्रस्थानी ठेवून डॉ. शेषराव मोरे, डॉ. सदानंद मोरे, रमेश पतंगे, अरविंद गोखले, गिरीश प्रभुणे, डॉ. अशोक मोडक, शरद कुंटे, चंद्रशेखर टिळक इत्यादी मान्यवरांचे चिकित्सक लेख या ग्रंथात असतील. त्यामुळे ग्रंथ अत्यंत संग्राह्य असेल.