महामार्गावरचे वनीकरण

आता महामार्गाच्या दुतर्फा आणि मधोमध कोकणाच्या वातावरणाला पूरक अशी झाडे लावली गेली पाहिजेत. तसे सुरुवातीपासूनच सांगितले गेले आहे. सातत्याने त्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे वनीकरण करून घ्यायचे असेल, तर ते स्थानिक स्वरूपातच होणार हे नक्की. त्यासाठी कोणताही कंत्राटदार नेमला जाणार नाही. म्हणूनच स्थानिक जातीची झाडे निवडणे आणि त्यांची लागवड करणे तसेच त्यांची जोपासना करणे ही कोकणवासीयांचीच जबाबदारी आहे. अन्यथा हा महामार्ग कोकणातून जाणारा तरीही उजाड महामार्ग ठरणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ३० मार्च २०२३ रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची (NH 66) हवाई पाहणी केली. त्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत होते.