दुबईची संधी साधणार कशी?

मुळात ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वरूपातच साखळी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यासाठी नेमके काय करावे लागते, याची माहिती उत्पादकांना नसते. त्यामुळे राज्य आणि देशपातळीवरही उत्पादने पोहोचू शकत नाहीत. अशा स्थितीत जागतिक पातळीपर्यंत ती कशी पोहोचणार, हा प्रश्नच आहे. दुबईतील मीटच्या निमित्ताने गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने, तसेच त्यांच्याकरिता प्रयत्न करणाऱ्या स्थानिक उद्योजकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वस्त्रसंहिता आणि आचारसंहिता

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता वस्त्रसंहिता अमलात येणार आहे, ही फारच चांगली बाब आहे. सर्वच मंदिरांमध्ये ती व्हायला हवी आहे. पण वस्त्रसंहिता जारी करतानाच मंदिराच्या व्यवस्थापनाच्या बाजूने असलेली आचारसंहिताही तेवढीच महत्त्वाची आहे. मंदिरांचे पावित्र्य भाविकांनी जपले पाहिजे, हे जितके खरे आहे, तितकेच मंदिराचे व्यवस्थापन आणि प्रामुख्याने पुजारी यांनीही आचारसंहिता पाळली पाहिजे.

फटाक्यांविना दिवाळी

हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवू नयेत, अशी हास्यास्पद सूचना देणारे लोकप्रतिनिधी याचा विचार कधी करणार आहेत? फटाके वाजवायला बंदी करण्यापेक्षा मुळातच फटाक्यांची निर्मितीच थांबविली गेली पाहिजे. फटाके तयारच झाले नाहीत, तर ते वाजविले जाणारच नाहीत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. आवाजाचा नव्हे, हे लोकमानसावर ठसले पाहिजे. प्रकाशाच्या, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त दिवाळीसाठी शुभेच्छा!

कोकणाची स्मृतिचित्रे

‘आठवणीतलं कोकण’ या विशेषांकाबरोबरच ‘कोकण मीडिया’ने आठव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोकण मीडिया’चा हा आठवा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. त्याचे कारण म्हणजे कोकणवासीयांनी जपलेल्या कोकणाविषयीच्या आठवणी त्या निमित्ताने संकलित करता आल्या. कोकणाविषयीची ही माहिती लिहिणारे स्मृतिवाहक, ती माहिती संकलित करून अंक प्रकाशित करण्यासाठी साह्यभूत ठरलेले जाहिरातदार, माहिती वाचणारे वाचक, अंकाचे वितरक या सान्यासह सर्वांनाच दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्ट हीच जात, श्रमसंस्कृती हाच धर्म

आर्थिक उन्नती हेच आरक्षणाच्या मागणीचे प्रमुख उद्दिष्ट असेल तर श्रमांना प्रतिष्ठा देण्यासाठी याच नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यातून आरक्षणाचा मूळ मुद्दाच नाहीसा होऊ शकेल. पण याची सुरुवात कोणी करायची, हाच खरा प्रश्न आहे. तो सर्वच नेत्यांनी सोडविला तरच मार्ग निघणार आहे.

सातत्याचे दुर्लक्ष हेच कारण

मुंबई-गोवा महामार्गावरचा सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.