महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
उद्याचे जबाबदार नागरिक घडवायचे असतील, तर लहान वयातच त्यांना योग्य ध्येयांची दिशा मिळायला हवी. तसेच, त्या दिशेने जाण्याचा दृढ संकल्प केल्यास त्यांची वाटचाल सुकर होते. म्हणून संकल्पाचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसण्याकरिता रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता १८ जुलै २०२६ रोजी संकल्पदिन साजरा करण्यात आला.
भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विशेष योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून योगासनांचे धडे गिरवले.
रत्नागिरी पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगाभ्यास आणि योगप्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज रत्नागिरी जिल्हा परिषदेने रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात योगशिबिराचे आयोजन केले होते.
आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सावंतवाडी येथे २१ जून २०२२ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीचे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि सावंतवाडीतील सौ. माया चव्हाण यांचा योगसाधना वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.