कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी पोलिसांनी साजरा केला योगदिन

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगाभ्यास आणि योगप्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, तसंच अंमलदार उपस्थित होते. या वेळी योगशिक्षक कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्यासह पतंजली निरामय योग संस्थेतील वीरू स्वामी आणि ३५ सहकाऱ्यांनी योग आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं दाखवली. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी निरोगी आणि तणावमुक्त आयुष्यासाठी दररोज २० ते ३० मिनिटं योगासनांसाठी समर्पित करण्याचं आवाहन दराडे यांनी केलं. या कार्यक्रमाला पोलिसांव्यतिरिक्त विद्यार्थी आणि नागरिकही उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply