बालसाहित्यिक मदन हजेरी यांना गोवंडे पुरस्कार प्रदान

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कै. श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

‘गणपत वाणी’मुळे चिपळूणचे नाव जगभर – एअरमार्शल हेमंत भागवत

चिपळूण : चिपळूणमधील साहित्य संस्थांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेळ्या ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेमुळे चिपळूणचे नाव जगभर पोहोचले आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी केले.

डॉ. आंबेडकर वाचनालयाचा रौप्य महोत्सव साहित्यिक कार्यक्रमांनी उत्साहात

चिपळूण : चिपळूण नगरपालिका पुरस्कृत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून झालेल्या विविध साहित्यिक कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला.