रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाणे येथील श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘लहान मुलांची बाप गोष्ट’ बालनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.