राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत सुवर्णतुला प्रथम; रत्नागिरीच्या ‘कट्यार’ला तिसरा क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत १० मार्च ते २७ मार्च २०२२ या कालावधीत झालेल्या साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत संगीत सुवर्णतुला या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई या संस्थेने ते नाटक सादर केले होते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज (२९ मार्च) ही घोषणा केली आहे.

अमृत नाट्य भारती, मुंबई या संस्थेने सादर केलेल्या धाडिला राम तिने का वनी या नाटकाला द्वितीय, तर रत्नागिरीच्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. (या नाटकांमधील गाणी, तसेच काही अंश असलेले व्हिडिओज बातमीच्या शेवटी दिले आहेत.)

हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला होता. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात स्पर्धेतील नाट्यप्रयोग झाले होते.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद मराठे, विजय कुलकर्णी, विलास कुडाळकर, ज्ञानेश पेंढारकर, अर्चना साने यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

सविस्तर निकाल असा

दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक : यतिन माझिरे (आरंभी स्मरितो पाय तुझे)
(व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/gwbL1mkOd8A)

नाट्यलेखन
प्रथम : विलास कर्वे (गोपिका रमणु स्वामी माझा) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/KozyLEWI0wk)
द्वितीय : यतिन माझिरे (आरंभी स्मरितो पाय तुझे)

संगीत दिग्दर्शन
प्रथम : शिवानंद दाभोलकर (विठू आले माहेरा) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/HtAFGHUR6PE)
द्वितीय : निळकंठ गोखले (गोपिका रमणु स्वामी माझा)

नेपथ्य
प्रथम : अंकुश कांबळी (तुका म्हणे आता) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/_QKCkLNLAEo)
द्वितीय : सुधाकर घाणेकर (सुवर्णतुला) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/pzxYg4Jv0yk)

संगीतसाथ – ऑर्गनवादक
प्रथम : आनंद वैशम्पायन (गोपिका रमणु स्वामी माझा)
द्वितीय : प्रसाद शेवडे (मत्स्यगंधा) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/yRMktmIu84s)

संगीतसाथ – तबला
प्रथम : दत्तराज च्यारी (विठू आले माहेरा)
द्वितीय : प्रथमेश शहाणे (सुवर्णतुला)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक
अभिजित केळकर (आरंभी स्मरितो पाय तुझे)
जगन्नाथ आंगणे (तुका म्हणे आता)
पीयूषा तेंडोलकर (मत्स्यगंधा)
स्नेहल गुरव (विठू आले माहेरा)

उत्कृष्ट गायन रौप्यपदक
विशारद गुरव (सुवर्णतुला)
स्वानंद भुसारी (कट्यार काळजात घुसली)
दिव्या पळसुले-देसाई (मत्स्यगंधा)
शारदा शेटकर (शिक्का कट्यार) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/pyF2o7X8jzo)

संगीतसाथ – ऑर्गनवादक
प्रथम : आनंद वैशम्पायन (गोपिका रमणु स्वामी माझा)
द्वितीय : प्रसाद शेवडे (मत्स्यगंधा) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/yRMktmIu84s)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
नम्रता काळसेकर (गंधर्वगाथा) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/dJaYXRnv3Gc)
प्राजक्ता जोशी (ययाती-देवयानी) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/1Ssh0wf27Ks)
मनाली जोशी (कट्यार काळजात घुसली) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/gcfxEdG7hMQ)
प्रियांका मुसळे (तुका म्हणे आता)
अपूर्वा ओक (सूर साज) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/XkO3-rEKx50)
गुरुप्रसाद आचार्य (सुवर्णतुला)
योगेश जोशी (देवमाणूस) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/h2yJAMTBG6I)
दशरथ नाईक (विठू आले माहेरा)
नितीन मतकरी (धाडिला राम तिने का वनी)
विपुल निमकर (सुवर्णतुला)

गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
सिद्धी बोंद्रे (धाडिला राम तिने का वनी)
तन्वी गोरे (धाडिला राम तिने का वनी)
स्वरप्रिया बेहेरे (कट्यार काळजात घुसली) (व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर : https://youtu.be/AIQUuatvIIg)
देवश्री शहाणे (सुवर्णतुला)
वेदवती परांजपे (आरंभी स्मरितो पाय तुझे)
साईश प्रभुदेसाई (कट्यार काळजात घुसली)
दत्तगुरू केळकर (विठू आले माहेरा)
तनय पिंगळे (धाडिला राम तिने का वनी)
रोहन देशमुख (धाडिला राम तिने का वनी)
अजिंक्य पोंक्षे (ययाती आणि देवयानी)

विजेत्या नाटकांमधील गीते आणि काही अंश पाहा सोबतच्या व्हिडिओजमध्ये

स्पर्धेतील सर्व नाटकांची प्लेलिस्ट खाली दिली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply