रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रदर्शनाची सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिन, गुढीपाडवा, नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित उद्योगिनी आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाची सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात सांगता झाली.

महिलांसाठी उपयुक्त हर्बल द्रव्ययुक्त सॅनिटरी पॅडची निर्मिती सुरू

रत्नागिरी : पूर्णपणे हर्बल द्रव्ये वापरून तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन केंद्र हरचिरी (ता. रत्नागिरी) येथे सुरू झाले. विशेष बाब म्हणजे ही पॅड्स विघटनाद्वारे पर्यावरणात मिसळून जाणारी आहेत.

महिलांनी कृषीप्रक्रिया उद्योजक व्हावे : पूजा निकम

रत्नागिरी : महिलांनी शेती करून शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया करून यशस्वी उद्योजिका बनावे, असे आवाहन चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजा शेखर निकम यांनी केले.

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे बचत गट, उद्योगिनींचे दिवाळी प्रदर्शन सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे सलग पंधराव्या वर्षी दिवाळीनिमित्त आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींनी निर्मिती केलेल्या वस्तूंचे दिवाळी प्रदर्शन आजपासून जे. के. फाइल्स येथील साई मंगल कार्यालयात सुरू झाले.

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योगिनी व महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाची सांगता बक्षीस वितरणाने आठ मार्च रोजी झाली. या वेळी संयोजिका प्राची शिंदे यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते आणि पावसच्या आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रगती खातू यांचा सन्मान केला.