राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम, ‘इठ्ठला’ द्वितीय

चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ या संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘वीरशैव समाज, लांजा’ या संस्थेच्या ‘इठ्ठला’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर कढीपत्ता नाटक प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून प्राथमिक फेरीत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कढीपत्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.

मुलांवर स्वप्ने लादू पाहणाऱ्या कुटुंबातील संघर्ष दाखविणारे नाटक – स्वप्नपक्षी

रत्नागिरी : आपली स्वप्ने मुलावर लादू पाहणाऱ्या आई-वडिलांमुळे मुलाला आत्महत्या करायला प्रवृत्त होईपर्यंतचा मानसिक ताण होतो. समाजातील पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मोहापायी विस्कटून जाणाऱ्या अशा कौटुंबिक मानसिकतेचे दर्शन स्वप्नपक्षी या नाटकात घडते.

कढीपत्ता नाटकातून उत्तम कौटुंबिक प्रबोधन

रत्नागिरी : जेवणातील कढीपत्त्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांना आजकालच्या मुलांनी आपल्या जीवनातून बाजूला करू नये, असा संदेश देणारे कढीपत्ता नावाचे कौटुंबिक प्रबोधनात्मक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी सादर करण्यात आले.

शेतकरी कुटुंबाचे चित्रण करणारे नाटक – चांदणी

रत्नागिरी : शेतकऱ्याच्या कुटुंबाचे चित्रण करणारे चांदणी नावाचे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीत सोमवारी, दि. २डिसेंबर रोजी सादर करण्यात आले.

सिद्धार्थ गौतमाचा बुद्धापर्यंतचा प्रवास साकारणारे महानायक

रत्नागिरी : शुद्धोधन राजाच्या पोटी जन्माला आलेल्या सिद्धार्थ गौतमाचा भगवान बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास साकारणारे महानायक नावाचे नाटक रत्नागिरीत हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या पाचव्या दिवशी सादर करण्यात आले.