राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम, ‘इठ्ठला’ द्वितीय

मुंबई : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ या संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘वीरशैव समाज, लांजा’ या संस्थेच्या ‘इठ्ठला’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी आज (१२ डिसेंबर) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा निकाल जाहीर केला. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
खरडेवाडी क्रीडा मंडळ, मेर्वी या संस्थेच्या ‘इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स)’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
दिग्दर्शन
प्रथम – ओंकार पाटील (अग्निपंख),
द्वितीय – अमोल रेडीज (इठ्ठला)
तृतीय – संदेश तोडणकर (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)
प्रकाशयोजना
प्रथम – साई शिर्सेकर (अग्निपंख)
द्वितीय – दयानंद चव्हाण (इठ्ठला)
तृतीय – अभिजीत डोंगरे (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)
नेपथ्य
प्रथम – प्रवीण धुमक (अग्निपंख)
द्वितीय – संदीप सावंत (इठ्ठला)
तृतीय – सत्यजित गुरव (येऊन येऊन येणार कोण?)
रंगभूषा
प्रथम – उदयराज तांगडी (अग्निपंख)
द्वितीय – गजानन पांचाळ (इठ्ठला)
तृतीय – नरेश पांचाळ (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)
संगीत दिग्दर्शन
प्रथम – ओंकार बंडबे (अग्निपंख)
द्वितीय – प्रदीप कांबळे (इठ्ठला)
तृतीय – योगेश मांडवकर (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)
वेशभूषा
प्रथम – चैताली पाटील (अग्निपंख)
द्वितीय – संतोष डोर्लेकर (इठ्ठला)
तृतीय – विश्वनाथ नवाले (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – मिनार पाटील (अग्निपंख) व ऋचा भुते (अग्निपंख)
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – अमोल रेडीज (इठ्ठला), जयू पाखरे (ऑक्सिजन), संदेश तोडणकर (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स), गोपाळकृष्ण जोशी (येऊन येऊन येणार कोण?), अर्चना पेणकर-पांचाळ (इठ्ठला), तन्वी शिंदे (इम्युनिटी – द व्हॉइस ऑफ टॉलरन्स), डॉ. नेहा उकिडवे (मंगलाक्षता), निवेदिता मणचेकर (ऑक्सिजन)

१० नोव्हेंबर २०२५ ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहात अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास पांगारकर, सुनील जगताप आणि श्रीमती संगीता टेकाडे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे, तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. (इठ्ठला नाटकाचे व्हिडिओ जाहिरातीच्या खाली)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply