अर्जुना-निवासा नदीसंगमावर सर्वपित्री अमावास्येला नदीपूजन

राजापूर : राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्येला ऐतिहासिक रायपाटण (ता. राजापूर) गावातील अर्जुना आणि निवासा नद्यांच्या संगमावरील संगनाथेश्वर मंदिराच्या घाटावर नदीपूजन करण्यात येणार आहे.

करंबेळे, बोले कुटुंबीयांच्या पुढाकाराने कोट येथे वाचनालय

लांजा : कोट (ता. लांजा) गावातील दिवाळेवाडीतील बोलये आणि करंबेळे कुटुंबीयांनी एकत्र येऊन पंचक्रोशतील विद्यार्थी आणि भावी पिढीला दिशा देण्यासाठी गुरुकृपा वाचनालय सुरू केले.

पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या : विजय हटकर

लांजा : कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या, असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझमचे संचालक प्रा. विजय हटकर यांनी येथे केले.

ओव्यांच्या साथीने गोमंतकीय मराठी कवितांची लांज्यात बरसात

लांजा : ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितांचे पीठ पडत होते.‌ जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्याचे रसिक न्हाऊन निघाले.

मसापतर्फे शनिवारी लांज्यात ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ कार्यक्रम

लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा आणि लोकमान्य वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १५ जुलै) रोजी लांजा येथे गोमंतकीय कवींचा ‘गंध मातीचा…छंद कवितेचा’ या कविता आणि लोकवाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे वृक्षारोपण

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या लांजा आणि राजापूर ग्रामीण शाखांनी वाटूळ दाभोळे मार्गानजीक १०० रोपांचे वृक्षारोपण केले.