सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आणखी १४ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. त्यापैकी सात रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबईत गेला आहे. त्यामुळे एकूण ४४ रुग्णांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
काल (२९ मे) रात्री आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ते सर्व रुग्ण कणकवली तालुक्यातील
आहेत. त्यामध्ये वारगाव येथील पाच, उंबर्डे बिडवाडी येथील दोन, कासार्डे धुमाळवाडीतील एक, सडुरे तांबळघाटी येथील एकाचा समावेश आहे. आज (३० मे) रात्री ५ नवे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबूब नगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, माडखोल, कुडाळ तालुक्यातील पणदूर-मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत.
(रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थितीची आजची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
One comment