खेडशी : रत्नागिरीची भारतीय जैन संघटना, खेडशीतील लक्ष्मी नारायण नगर, एकता नगर, गणेश नगर रहिवासी संघ मथुरा पार्क आणि सरस्वती नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ७ जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
संपूर्ण देशासह राज्यातही करोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. करोना महामारीविरुद्धच्या लढाईत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयानेही केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे सामाजिक कार्य जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या मदतीने पार पाडले जाणार आहे. रक्तदान रविवार, ७ जून २०२० रोजी खेडशीतील मुख्याध्यापक भवनात (महालक्ष्मी मंदिराजवळ) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फार गर्दी होऊ नये, यासाठी एका वेळी चार ते सहा जणांना रक्तदान करता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे पूर्वनाव नोंदणी आवश्यक आहे. रक्तदात्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. नियमानुसार प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने शिबिराच्या ठिकाणी बोलावणे शक्य व्हावे, यासाठी रक्तदात्यांनी आपले पूर्ण नाव, वय, मोबाइल क्रमांक, माहीत असल्यास रक्तगट इत्यादी माहिती कळवावी. त्यासाठी संपर्क क्रमांक असे : महेंद्र गुंदेचा-9422429599, वसंत बंडबे-7798954927, दिगंबर शिंदे-9028832006, विष्णू पवार-7620392600, आशू कळंगूटकर-9960326216 आणि तुळशीदास वडर-9970801149.
अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
