साप्ताहिक कोकण मीडिया – पाच जूनचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ५ जून २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/22rxzfq येथे क्लिक करा.

पाच जून २०२०च्या अंकात काय वाचाल?
संपादकीय :
…. कालचा गोंधळ बरा होता… (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुखपृष्ठकथा : गरज पर्यावरणपूरक राजकारणाची
पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने धीरज वाटेकर यांचा विशेष लेख….

‘आत्मनिर्भर भारत’ उद्योजकांसाठी संधीच : केंद्र सरकारच्या वीस लाख कोटींच्या पॅकेजचा आढावा घेणारा, सीए तेजस पाध्ये यांच्या लेखाचा उत्तरार्ध…

‘निसर्ग’च्या व्यवस्थापनाचा धडा – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा लेख…

शहाणी झाडं – बाबू घाडीगावकर यांचा प्रासंगिक, ललित लेख…

टाळेबंदीत शोधली संधी
रेंज मिळविण्यासाठी रानोरानी

वटपौर्णिमा ‘अशी’ साजरी करू या? – श्रद्धा कळंबटे यांचे विचार…

Leave a Reply