रत्नागिरीची करोना रुग्णसंख्या ३४३; सिंधुदुर्गने शंभरी ओलांडली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज (पाच जून) जिल्ह्यात नऊ नव्या करोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ३४३वर पोहोचली आहे. त्यापैकी १२९ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले असून, आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (चार जून) आठ नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा १०५ झाला आहे.

रत्नागिरीची स्थिती
रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून आज (पाच जून) प्राप्तम झालेल्या अहवालांमध्ये एकूण नऊ व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील आठ, तर गुहागर तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज गुहागर येथील चार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

आज अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झालेला आहे. त्यातील एक रुग्ण आंबोळगड (ता. राजापूर) येथील असून, दुसरा रुग्ण मांडिवली (ता. दापोली) येथील आहे.

रत्नागिरीत ११६ कन्टेन्मेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या ११६ ठिकाणी कन्टेन्मेन्ट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १५ गावांमध्ये, गुहागर तालुक्यात आठ गावांमध्ये, खेड तालुक्यात १६ गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात २३ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये दोन गावांमध्ये, दापोलीत १६ गावांमध्ये, लांजा तालुक्यात आठ गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात १७ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात ११ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी – ४२, उपजिल्हा रुग्णालय – ४, कळंबणी रुग्णालय – ४, ग्रामीण रुग्णालय गुहागर- २, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – ६, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – ४, कोव्हिड केअर सेंटर वेळणेश्वर – १ आणि कोव्हिड केअर सेंटर घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड – ५ असे एकूण ६८ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत. तसेच जिल्याइ मध्ये आतापर्यंत विविध रुग्णालयांत १०२३ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ९५५ संशयित रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची तालुकानिहाय संख्या

होम क्वारंटाइनची संख्या घटली
मुंबईसह मुंब महानगर प्रदेश क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. यातील १२ हजार १२० जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आज रोजी होम क्वारंटाइन असणाऱ्यांची संख्या ६५ हजार ६१२ इतकी आहे.

सहा हजारांहून अधिक नमुन्यांची तपासणी
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत एकूण सहा हजार ६३१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यापैकी सहा हजार ३३० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अजून ३०१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ३०१ प्रलंबित अहवालमध्ये चार अहवाल कोल्हापूर येथे, तर २९७ अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात चार जूनपर्यंत एकूण एक लाख १८ हजार १३९ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात, तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या ४६ हजार ५०५ आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या १० हजार २८९ आहे.

परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात ६३ निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. यात २२ जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
……….
सिंधुदुर्गातील स्थिती
चार जून २०२० रोजी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार नव्या आठ व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये देवगड तालुक्यातील तीन, वैभववाडी, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येकी एका आणि कणकवली तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १०५ अशी झाली आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबईला गेला आहे. १७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ८५ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. (सिंधुदुर्गातील स्थितीचा तक्ता खाली दिला आहे.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply