ठाणे : विद्याभारतीतर्फे बालकांचे जागरूक माता-पिता, पालक, नवशिक्षक, जुने आचार्य आणि शिशूंसाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी डिजिटल शिशुवाटिका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक पालक आपल्या बालकाला सर्वोत्तम ते मिळावे, त्याचे आयुष्य सर्वांगसुंदर आणि समृद्ध व्हावे, यासाठी धडपडत असतो. त्याला उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी ते बालकाला घरासारखे वातावरण देणारी, उत्तम संस्कार करणारी आणि त्याच्या उपजत क्षमतांचा विचार करून त्याला आनंददायी, हसत खेळत, प्रत्यक्ष अनुभवातून जीवनाचे ज्ञान देणारी शाळा ते निवडत असतात. याचा विचार करून शिशू शिक्षणासंबंधी अत्यंत सखोल आणि मूलगामी चिंतन करून विद्याभारतीने शिशुवाटिका शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. ही पद्धती देशभरात ३० हजार ००० विद्यालयांतून ४० लाख बालकांपर्यंत पोहोचली आहे.
बालकाला शिकवण्याची जबाबदारी जशी शाळेची आहे, तशीच ती पालकांचीही आहे. म्हणून शिशुशिक्षण कसे असावे, त्यासाठी काय करायला हवे, याचा जे विचार करतात, असे माता आणि पिता, पालक, नवशिक्षक, जुने आचार्य आणि शिशूंसाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी विद्याभारती दरवर्षी प्रशिक्षण आणि प्रबोधन वर्गाचे आयोजन करत असते. यावर्षी करोनाच्या संकटामुळे निवासी वर्ग घेणे शक्य नसल्याने डिजिटल प्रशिक्षण वर्गाची योजना विद्याभारतीने केली आहे. शिशुवाटिका पद्धत समजून घ्यावी, असे वाटणाऱ्या सर्वांनी, संस्थांच्या शिक्षकांनी या शिशुशिक्षण प्रशिक्षण वर्गात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन विद्याभारतीच्या कोकण विभागातर्फे महाराष्ट्र गोवा शिशुवाटिका प्रमुख भाई उपाले, प्रांतमंत्री संतोष बाळासाहेब भणगे, अध्यक्ष प्रदीप सदाशिव पराडकर, प्रांत शिशुवाटिका प्रमुख सौ. भावना भालचंद्र गवळी आणि सहप्रमुख सौ. नंदिनी किरण भावे यांनी केले आहे.
प्रशिक्षण वर्ग डिजिटल असल्याने सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणाथींकडे अॅण्ड्रॉइड फोन किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण वर्गाचा तपशील असा आहे – प्रशिक्षण वर्गाचा कालावधी १५ जुलै ते २० जुलै २०२० पर्यंत आहे. वर्गाची वेळ दुपारी ३ ते ४ आणि ४.१५ ते ५.१५ अशी असेल. डिजिटल वर्ग असल्याने गुगल फॉर्म भरून नोंदणी करावी. वर्गाचे शुल्क १०० रुपये आहे. हे शुल्क विद्याभारती, कोकण मुंबई प्रांताच्या खात्यामध्ये जमा करावे आणि त्याबाबत सौ. भावना गवळी (९९६०८२७५३८) यांना कळवावे. बँक खात्याचा तपशील असा – बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखा. खात्याचे नाव : विद्याभारती, कोकण, मुंबई. खाते क्रमांक : 007210110010520. IFSC : BKID0000072. प्रशिक्षणाची सत्रे Google Meet वर होतील. त्यासाठी Google Meet App इंन्स्टॉल करून ठेवावे. नोंदणी केलेल्या प्रशिक्षणाथींना प्रत्येक सत्राच्या १५ मिनिटे अगोदर Link पाठवली जाईल. रोजची दोन्ही सत्रे पूर्ण वेळ उपस्थित राहणे बंधनकारक असेल. प्रशिक्षणाच्या वेळी सोबत वही-पेन असावे. दिला जाणारा गृहपाठ पूर्ण करून तो 9960827538 किंवा 8652070701 या क्रमांकावर पाठवावा.
प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी संबंधित जिल्ह्यांमधील खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा. १) सिंधुदुर्ग डॉ. सौ. मेधा फणसळकर (9423019961), २) रत्नागिरी – सौ. छाया मुसळे (9403144035), ३) ठाणे- रायगड – सौ. भावना गवळी (9960827538). ४) मुंबई-पालघर – सौ. नंदिनी भावे (8652070701). Link साठी – सौ. प्रगती भावसार (9167173711)
……..