रत्नागिरी : कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकात वीस खाटांचे क्वारंटाइन सेंटर उभारले आहे. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेतील एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या बाधेने मृत्यू झाला होता. त्यानंतर कोकण रेल्वेच्या पन्नास कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल नकारात्मक आले होते.
सध्या रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू नसल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी नाही; मात्र मालवाहतूक सुरू असल्याने कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकात क्वारंटाइन सेंटर उभारले आहे.
……..