रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या एसटीच्या गाड्यांचे तिकीट दरपत्रक एसटीच्या रत्नागिरी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, कल्याण आणि पुणे येथून मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख रत्नागिरी, लांजा आणि राजापूर येथे येणाऱ्या गाड्यांचे हे दरपत्रक आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या गाड्यांचे तिकीटदर त्यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. मुंबई ते रत्नागिरी दिवसा धावणाऱ्या गाडीचे तिकीट ४५० रुपये तर रात्रीच्या गाडीचे तिकीट ५३० रुपये आहे. पुण्यातून रत्नागिरीत दिवसा येणाऱ्या गाडीचे तिकीट ३९० रुपये तर रात्रीच्या गाडीचे तिकीट ४६० रुपये आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांसाठी काही विशेष गा्डया सोडण्यात येणार असून येत्या १२ ऑगस्ट २०२० पर्यंतच या गाड्या धावणार आहेत. त्या गाड्यांचे दरपत्रक सोबत दिले आहे.
