रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ९) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाबाधितांच्या संख्येत ६५ जणांची भर पडली असून, करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या २२१३ झाली आहे. आजच्या दिवसभरात पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ७८ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४८९ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ६७.२ टक्के आहे.
आज १० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४८९ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय ८, कळंबणी, खेड येथील १ आणि कामथे, चिपळूण येथील एकाचा समावेश आहे. आज आढळलेल्या ६५ पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी ४, कामथे ४४, लांजा १, गुहागर ४, दापोली ५, अँटिजेन टेस्ट ७.
आज मिळालेल्या माहितीनुसार पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दापोलीतील एका ४३ वर्षे वयाच्या व्यक्तीचा अहवाल अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला कळंबणी येथे दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा मृत्यू झाला. दापोलीतील ७० वर्षीय महिलेचादेखील मृत्यू झाला. झरी रोड, चिपळूण येथील ६४ वर्षीय रुग्ण, राजिवडा, रत्नागिरी येथील ६४ वर्षीय रुग्ण आणि मारुती मंदिर, रत्नागिरी येथील ४४ वर्षीय रुग्णाचा कोल्हापूर येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित मृतांची संख्या आता ७८ झाली आहे. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी २२, खेड २, गुहागर २, दापोली १६, चिपळूण १५, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ७ आणि मंडणगड १. सध्या एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४६ आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाली. आजअखेर त्यांची संख्या ४१ हजार १४२ झाली आहे.

दरम्यान, रत्नागिरी शहरात बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयाचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी आज ऑनलाइन उद्घाटन केले. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला पूरक म्हणून हे रुग्णालय आता करोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरीचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. रुग्णालयात १०७ बेड्स असून करोनाच्या उपचारांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड