भाद्रपद कृ. दशमी, शके १९४२
॥ श्रीराम ॥ ऐसा सर्वांगें सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु । त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५ ॥
अर्थ : असा हा गणपती सर्व अवयवांनी सुंदर आहे. सर्व विद्यांचा साठा त्याच्याकडे असल्याने तो त्या सर्वांचा स्वामी आहे. त्याला मी अगदी मनापासून साष्टांग नमस्कार करतो.
…….
१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

