वृद्धाश्रमात थरथरत्या हातांनी साकारली गणेशमूर्ती

भिवंडी (जि. ठाणे) : येथील वृद्धाश्रमात थरथरत्या हातांनी साकारलेल्या गणेशमूर्ती पाहून त्यांना धडे देणाऱ्या आरती शर्माही भारावून गेल्या.

गतिमान यांत्रिक आधुनिक युग वन वुमन वन किचन जीवनपद्धतीने नव्याने रूढ होत आहे. या परिणामांमुळे या काळात पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लोप पावत विभक्त कुटुंबव्यवस्था वेगाने ढासळत आहे. रोजच्या धकाधकीच्या युगात विभक्त कुटुंबातील व्यक्तीचे घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडे, त्यांच्या आरोग्याकडे साहजिकच सहजच दुर्लक्ष होते. त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात ज्यांनी कर्तृत्व गाजवले, आपल्या मुलांसाठी आयुष्यभर राब राब राबल्या, खस्ता खाल्ल्या, अशी वयोवृद्ध मंडळी आर्थिक अडचणी आणि त्यांचे आरोग्य या कारणामुळे दूर वृद्धाश्रमात एकाकी पडू लागली आहेत.

अशा ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळात गणेशोत्सव व्हावा , या माणुसकीच्या दृष्टिकोनातून बेघर, गरीब, अपंग आणि मानसिकदृष्ट्या आजारी वृद्धांना सांभाळणाऱ्या स्मित वृद्धाश्रमात आजी-आजोबांना पर्यावरण संवर्धनाची संकल्पना घेऊन स्मित फौंडेशन व कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टिव्हिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून इको-फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. काल्हेर (भिवंडी) येथील संजीवनी कॉम्प्लेक्समध्ये ही कार्यशाळा झाली.

प्रदूषणविरहित आणि नैसर्गिक विसर्जनाची सुरवात व्हावी यासाठी मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वय वर्षे ७० पासून ते ९६ वर्षे वयाच्या वृद्धांनी गणेशमूर्ती साकारली. कार्यशाळेत ८९ वृद्धांनी स्वतःच्या हातांनी बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकून घेतले.

(अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ९३७२२२३६११ किंवा ९२७२२२६२२६)

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply