रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा अधिक ३० रुग्ण करोनामुक्त


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ९ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ८५ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ५५ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७३ हजार ८९ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.२४ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ५५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १२१२ नमुन्यांपैकी ११८८ अहवाल निगेटिव्ह, तर २४ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या २५८७ पैकी २५५६ अहवाल निगेटिव्ह, तर ३१ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार ७२८ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ९३ हजार ५२८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १००८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ६७५, तर लक्षणे असलेले ३३३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५३१ आहे, तर ४७७ जण संस्थात्मक विलगीकरणात असून २७५ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १४४, डीसीएचसीमधील १५०, तर डीसीएचमध्ये १८३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ८५ जण ऑक्सिजनवर, ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३६६ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१२, खेड २१७, गुहागर १६६, चिपळूण ४६३, संगमेश्वर २०४, रत्नागिरी ७८९, लांजा १२४, राजापूर १५६. (एकूण २३६६).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply