सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 तासांत करोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (९ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी हा अहवाल दिला आहे. त्यानुसार आज जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या तिघांसह एकूण १३ नवबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार १६१ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, कणकवली २, कुडाळ ३, मालवण २, सावंतवाडी २, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील १. दाडोमार्ग आणि वैभववाडी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही..जिल्ह्यात सध्या १३३७ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४८ रुग्ण ऑक्सिजनवर तर १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १४८, दोडामार्ग ४०, कणकवली २२२, कुडाळ ३२६, मालवण २३४, सावंतवाडी २०१, वैभववाडी ५३, वेंगुर्ले ९२, जिल्ह्याबाहेरील २१.जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३७५ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७०, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८३, कुडाळ – २२६, मालवण – २७५, सावंतवाडी – १८८, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply