रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार २३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ६६ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ९९४ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.२० झाली आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ३६ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २११९ नमुन्यांपैकी २०८८ अहवाल निगेटिव्ह, तर ३१ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या २१५४ पैकी २११९ अहवाल निगेटिव्ह, तर ३५ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार ६७३ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ८९ हजार ७८४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १००३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ६५५, तर लक्षणे असलेले ३४८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५४३ आहे, तर ४६० जण संस्थात्मक विलगीकरणात असून ३११ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ११२, डीसीएचसीमधील १६२, तर डीसीएचमध्ये १८६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ८२ जण ऑक्सिजनवर, ५२ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज दोघा आणि आधीच्या एका अशा एकूण ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३६५ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१२, खेड २१६, गुहागर १६६, चिपळूण ४६३, संगमेश्वर २०४, रत्नागिरी ७८९, लांजा १२४, राजापूर १५६. (एकूण २३६५).
Follow Kokan Media on Social Media

