सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघाची निसर्ग छायाचित्र स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

विजेत्या पहिल्या तीन छायाचित्रांना अनुक्रमे मांक १० हजार, पाच हजार आणि अडीच हजार रुपयांची पारितोषिके आणि केंद्रीय पर्यटन संचालनालयामार्फत प्रमाणपत्र तसेच टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेतील छायाचित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे. छायाचित्र १२ इंच बाय १८ इंच आकारातील असावे. छायाचित्राविषयी माहिती द्यावी. स्पर्धेचे प्रवेश शुल्क २०० रुपये आहे. एका प्रवेशिकेसोबत एकच छायाचित्र असावे. छायाचित्रावर नाव टाकू नये. नाव पाठीमागे असावे. छायाचित्रेत येत्या २५ सप्टेंबरपर्यंत सोबत दिलेल्या प्रतिनिधीकडे पोहोचली पाहिजेत.

अधिक माहितीसाठी जितेंद्र पंडित, सावंतवाडी (८०८७७२५२५५), अविनाश सामंत, मालवण (९४०४१७२१९७), संतोष काकडे, कणकवली (९८२२१६७९६५) किंवा संजय सावंत, दोडामार्ग (९४२०२०५४६०) यांच्याशी संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply