Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे केवळ १२० सक्रिय रुग्ण

hand holding petri dish

Photo by Anna Shvets on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार केवळ १२० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दुबार नवे केवळ ४ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर एक जण बरे वाटल्याने घरी गेला. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

आज आढळलेल्या नव्या ४ करोनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग ०, कणकवली ३, कुडाळ ०, मालवण ०, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले १.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या १२० रुग्णांपैकी १५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९, दोडामार्ग ७, कणकवली ४४, कुडाळ २६, मालवण १०, सावंतवाडी १४, वैभववाडी ०, वेंगुर्ले ९, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५५ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९७, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version